fbpx
Saturday, October 23, 2021

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करत बदनाम करण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अनेकांची नावे समोर येतात. यात एक म्हणजे, पुणे जिल्ह्यात झोन वन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डी. सी. पी. प्रियांका नारनवरे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांच्याविरुद्ध एक दमदाटीची ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे.

मात्र, ऑडिओ क्लिपमधील आवाज हा डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांचा नाही, अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळत आहे. डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांची बदली करण्यासाठी ही बनावट ऑडियो क्लिप व्हायरल केली जात असून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच, अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी पुण्यातून परिचित झाले. डीसीपी प्रियांका नारनवरे यांची देखील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून पुण्यात ओळख आहे. मात्र आता हा प्रकार समोर येताच, अधिकाऱ्यांविरुद्ध असे षडयंत्र होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होणार? हा गंभीर प्रश्न समोर उभा राहतो.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »