fbpx
Saturday, October 23, 2021

पुणे व्हायरल क्लिप प्रकरण – पोलिस आयुक्तांच्या अंगलट येणार का?

पुणे येथील बनावट क्लिप प्रकरण हे पुणे पोलिस आयुक्त यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिस आयुक्त यांचा समावेश असण्याची शक्यता निर्माण होत आहे. या बनावट क्लिप तयार करण्याऱ्या हफ्तेखोर टोळीतील अनेक लोकांची बदली डी. सी. पी. झोन वन यांनी केली होती. तसेच त्यांनी वेळोवेळी अनेक हफ्तेखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध अहवाल देऊन सुद्धा अद्याप पर्यंत पोलिस आयुक्त यांनी कार्यवाही का केली नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या हफ्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्तांचे छुपे संरक्षण होते की काय? अशी चर्चा लहान आवाजात पोलिस आयुक्तालयात सुरू आहे.

पुणे पोलिस आयुक्तांबाबत शासनाकडे अनेक लोकांच्या तक्रारी गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातून त्यांची तडकाफडकी बदली होणार अशी पोलिस वर्तुळात चर्चा होती. आपली बदली थांबवण्यासाठी मागील आठवडयात पुणे पोलिस आयुक्त मुंबई येथे जाऊन वरिष्ठांची भेट घेऊन आल्याचे समजते. आता बनावट क्लिप प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त यांची संशयास्पद भूमिका समोर आल्यामुळे पुढे त्यांचे काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »