fbpx
Saturday, October 23, 2021

उपायुक्तांच्या कारवाईवर बदनामीचे कारस्थान

पुणे : पुणे पोलिस उपायुक्त यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची आता दुसरी बाजू समोर आली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजत आहे.
पोलीस उपायुक्तांनी रुजू झाल्यानंतर हफ्तेखोर अधिकारी कर्मचारी यांची उचलबांगडी केली. त्यांच्या अनेक अनाधिकृत व्यापारावर छापे टाकले. त्यामुळे जुने हप्तेखोर अधिकारी व कर्मचारी यांचे अवैध धंदे बंद पडले. याचाच सुड म्हणून या हफ्तेखोरांनी आपल्या अशाच काही अवैध धंदा चालवणाऱ्या लोकांना एकत्र केले यांनो झोन वन उपायुक्त यांची बनावट क्लिप तयार करून त्यांची क्लिप व्हायरल केली. ज्यामुळे त्यांची देखील बदली होईल.

या संपूर्ण प्रकरणात आता साळुंखे नावाच्या कर्मचाऱ्याचे नाव समोर येत आहे. तसेच त्याच्या सोबत काही उपायुक्त आणि वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी देखील सामील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तरीही या सर्व प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी आता सायबर गुन्हे शाखा याचा तपास करणात आहे. या सर्व हफ्तेखोरांची नावे यातून लवकरच पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »