fbpx
Saturday, October 23, 2021

पोलिस दलातील वातावरण दूषित, पुण्यातील पोलीस दलातील हफ्तेखोरी चव्हाट्यावर

पुणे : पुण्यात सध्या पोलिस दलात दूषित वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस दलातील हफ्तेखोरी आता चव्हाट्यावर आली आहे. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून पुण्यातील पोलिसांच्या ओळखीवर आता गालबोट लागले आहे. पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरी सुरु असून आता ती चव्हाट्यावर येत आहे. यामध्ये पोलीस अधिकारीच सामील असल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिकारी म्हणून आपली बदली झाल्यानंतर पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी पोलीस मुख्यालयात षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या महिला उपायुक्त यांनी काही अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून षडयंत्र केले असल्याची माहिती मिळत आहे.

मोठ्या प्रमाणत पुण्यात हफ्तेखोरी चालायची.त्या हफ्तेखोर लोकांच्या बदल्या तत्कालीन पुणे झोन वन DCP प्रियांका नारनवरे यांनी करत पुणे शहराला एक वेगळे वळण दिले होते. मात्र त्यांच्या या कामामुळे त्यांच्याविरूध्द कट रचला जात आहे. हफ्तेखोरी बंद करुन हफ्तेखोर लोकांची बदली केल्यामुळे त्यांच्या बनावट क्लिप बनवून मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. पदप्राप्तीसाठी त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या सगळ्या प्रकरणात, पुण्यातील हप्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊन कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बदनाम करून पदावरून काढण्याचा डाव असल्याचा संशय जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

हे गंभीर प्रकरण समोर येताच समाज माध्यमातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा डाव असून, या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेतून व्यक्त केली जात आहे. तसेच, पोलिसांची हफ्तेखोरी कधी थांबेल? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »