fbpx
Friday, October 22, 2021

राज्य सरकारकडून दिवाळीसाठी गाईडलाईन्स जारी; दिवाळी पहाट आणि फटाक्यांना बंदी!

 

मुंबई, 6 नोव्हेंबर : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना  राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर आता महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांच्या आतीषबाजीवर  बंदी घालण्यात आली आहे . कोरोना संकटाच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी (Diwali) सणासाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी करण्यात आल्या  असून  यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घातली आहे. याशिवाय यावर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन नागरिक ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे करू शकतात.

– दिवाळी सणासाठी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना:

1. यंदा दिवाळीचा  सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.

2. दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

4. फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.

5.  दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये.मात्र, नागरिक ऑनलाइन पद्धतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात.

6. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.

7. धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा

दरम्यान, दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा आणि योग्य खबरदारी घेऊन राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्वेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »