fbpx
Saturday, October 23, 2021

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 लाखांच्या उंबरठयावर; गेल्या 24 तासांत 38,074 नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

 

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसचे देशासह राज्यातील वाढते थैमान आता काही प्रमाणात कमी होताना दिसत असून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची गती आता मंदावली आहे. देशात गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षा कमी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 85 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 38 हजार 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 85 लाख 91 हजार 731 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5 लाख 5 हजार 265 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 27 हजार 59 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 लाख 59 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »