fbpx
Saturday, October 23, 2021

नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल; कॅबिनेमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही!

 

मुंबई, 5 नोव्हेंबर : जागतिक महामारी असलेल्या कोरोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील अनेक आस्थापणे बंद करण्यात आले होते . मात्र आता अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत . बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.आणि नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वासही व्यक्त केला. तर पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवरही निशाणा साधला. “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरं तर आमची चार पत्रं होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे. सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील सर्व आस्थापणावरील आता निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »