fbpx
Saturday, November 27, 2021

परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर!

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर उमेदवारांना आपला हा निकाल पाहता येईल. परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात या निकालाची घोषणा यूपीएससीनं केली आहे. काल 23 ऑक्टोबर 2020 रोजीच या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थी हा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात. आयोगाने यूपीएससी सीएस पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा देखील निकाल जाहीर केला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट काही तांत्रिक कारणास्तव काम करत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in येथे निकाल पाहण्यास अडचणी येत असतील, ते यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल upsconline.nic.in वर जाऊन पीडीएफ डाउनलोड करून देखील जाणून घेऊ शकतात.

जे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »