fbpx
Saturday, November 27, 2021

खुशखबर: उद्यापासून राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स पुन्हा सुरु होणार!

 

मुंबई , 4 ऑक्टोबर : जागतिक महामारी असलेल्या कोरोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील सिनेमा हॉल, चित्रपटगृह बंद करण्यात आले होते . मात्र आता अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.

तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि राज्य खेळांडूना सरावासाठी कंटेनमेंट झोनबाहेर स्विमिंग पूल उद्यापासून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर याशिवाय कंटेनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेनिस, बडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेम साठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »