fbpx
Saturday, November 27, 2021

किरीट सोमय्यांना लोकशाहीत आरोप करण्याचे अधिकार; शिवसेनेनं ते खोडावेत – चंद्रकांत पाटील

 

सातारा, 13 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार आहेत, शिवसेनेनं ते खोडावेत”, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी सेनेला दिलं आहे. साताऱ्यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण जाणीवपूर्वक समोर ठेवून अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत का?, असा प्रश्न भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला होता. त्याला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी कराराचे पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी कोर्टात जावे, असे पाटील म्हणाले. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते खोडावेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हंटल आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?,आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही. मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात.. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली, यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. गेल्या 11 महिन्यांपासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे हे सर्वसामान्यजनता पाहत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये राहुल गांधींचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा केला आहे, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, या विषयी मला माहीत नाही. पण असला प्रश्न संजय राऊत यांना विचारा, अस टोला पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे .

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »