fbpx
Saturday, November 27, 2021

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर: देशभरातील अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे, पगारवाढीचा  विचार सुरु!

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : जागतिक महामारी असलेल्या कोरोना संकटाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली होती. मात्र, आता सर्वकाही रुळावर येत असल्याने यांपैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत.मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे कमी केले पगार पूर्ववत केले आहेत. त्याचबरोबर कोविड लॉकडाउनच्या काळात चांगल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्सकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

इंधनापासून टेलिकॉम क्षेत्रात विविध नोकऱ्या उपलब्ध करुन देणाऱ्या रिलायन्स कंपनीने पुढील वर्षाच्या पगारामध्ये ३० टक्के अॅडव्हान्स देण्याचाही विचार करीत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात काम केलं अशा लाखो कर्मचाऱ्यांना सद्भावना म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे. तर बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवडयांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे. तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचं म्हटलं आहे. अनेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा कंपन्याही पगार कपात मागे घेण्याचा विचार करीत आहेत.

दरम्यान, करोना लॉकडाउनचा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला होता. या काळात या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या तर अनेकांना मोठ्या पागार कपातीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, आता सर्वकाही रुळावर येत असल्याचे चित्र दिसत आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »