fbpx
Saturday, November 27, 2021

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत  गप्प बसणार नाही……

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत  गप्प बसणार नाही; फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा..!
तसेच दुधाच्या मुक्तीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे यासाठी भाजप (BJP) रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांनी
काही दिवसांपूर्वीच  राज्यव्यापी आंदोलन पुकारल्यानंतर आता पुन्हा
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या घेऊन भाजप आक्रमक झाली आहे.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत  गप्प बसणार नाही; फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा..!
दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्याबाबद   राज्य सरकार  कुठलाही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ वेळकाढूपणा सुरू
आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत  गप्प बसणार नाही, असा इशारा  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला दिला आहे. याच प्रकारचा प्रश्न आमच्या सरकारच्या
कार्यकाळात उपस्थित झाला होता. तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूधखरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी
निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते. मात्र आता दूध उत्पादकांचा लढा आता
निर्णायक टप्प्यावर नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
आहे.या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. ही लढाई संपेपर्यंत भाजप गप्प बसणार
नाही. असा इशारा फडणवीस यांनी दिला. यासंदर्भात झालेल्या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,
महादेवराव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानीताई फरांदे आणि इतरही  प्रमुख नेते प्रामुख्याने
उपस्थित होते.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »