fbpx
Saturday, November 27, 2021

ठाकरे सरकारने शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

 

मुंबई 29 ऑक्टोबर : शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यां बाबदीत ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला घेतला असून राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतंच याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जारी केलं आहे. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यात मिशिन बिगेन अगेन अतंर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर मिशिन बिगेन अगेन या कार्यक्रमातंर्गत राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यास सहमती देण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिकसंस्था 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दूरस्थ शिक्षण/ Tele- Counselling आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »