fbpx
Saturday, October 23, 2021

पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या परीक्षा 10 नोव्हेंबरपर्यंत घेणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा!

मुंबई , 24 ऑक्टोबर : राज्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोव्हिडमुळे झाल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लागू केलेल्या विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाकरे सरकारनं कार्यवाही सुरु केल्याची माहिती सामंतानी दिली. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा आदेश दिल्यानंतर राज्यात परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, अतिवृष्टी, पूर, कोरोना इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देत्या आल्या नव्हत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोव्हिडमुळे झाल्या नाहीत त्या परीक्षा १० नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, असे सामंतांनी सांगितले. यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारच्या काळातील लागू केलेल्या विद्यापीठ कायद्यातमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सर्व कुलगुरूंसोबत चर्चा केली असून परीक्षांच्या आयोजनादरम्यान विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असल्याची माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिली.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »