fbpx
Saturday, October 23, 2021

आता सीएच्या परीक्षाही लांबणीवर

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या परीक्षा आता २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होतील. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित वेबसाइटवर उपलब्ध असल्याची माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

त्यानुसार आता फाउंडेशन कोर्स परीक्षा ८, १०, १२ आणि १४ डिसेंबर २०२० रोजी तर जुन्या स्कीमनुसार इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२० (ग्रुप १) आणि १, ३ आणि ५ डिसेंबर (ग्रुप २) अशा होतील. तसेच नव्या स्कीमनुसार इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षांच्या ग्रुप १ साठीच्या तारखा २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२० तर ग्रुप २ साठीच्या तारखा १, ३, ५ आणि ७ डिसेंबर अशा आहेत. नव्या स्कीमनुसार फायनल कोर्स परीक्षा २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२० (ग्रुप १) आणि २९ नोव्हेंबर, २, ४ आणि ६ डिसेंबर २०२०(ग्रुप २) रोजी घेतल्या जातील.

केंद्र वा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळीही सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे आयसीएआयने स्पष्ट केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »