fbpx
Saturday, October 23, 2021

तुम्हाला खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे का? ‘हे’ असू शकते कारण

गर्भवती महिलांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ‘डी’च्या प्रमाणावर जन्मानंतर मुलांमध्ये खाद्य एलर्जी उद्भवण्याची शक्यता अवलंबून असते. हेल्महोल्ट्जच्या क्रिस्टीन वेबेज टीम कडून केल्या गेलेल्या अभ्यासात ६२२ माता आणि त्यांच्या ६२९ मुलांवर प्रदीर्घ काळासाठी संशोधन करण्यात आले.अभ्यासात सर्वप्रथम गर्भवती आईचे रक्त आणि जन्माला येणाऱ्या मुलाच्या गर्भनाळेमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन डी चे परीक्षण केले गेले. यानंतर पहिल्या दोन वर्षात मुलांमध्ये आढळून येणाऱ्या खाद्य एलर्जीचे प्रमाण नोंदवण्यात आले. निकालात असे निदर्शनास आले, की ज्या गर्भवती महिलामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी होते, त्या मुलांमध्ये दोन वर्षाच्या दरम्यान खाद्य एलर्जीचे प्रमाण कमी होते.याचा अर्थ व्हिटॅमिन डी चे उच्च प्रमाण असलेल्या गर्भवती महिलांच्या मुलांमध्ये खाद्य एलर्जीचा धोका जास्त असल्याचे आढळून आले.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »