fbpx
Saturday, October 23, 2021

नैराश्याने घेतला माजी सीबीआय प्रमुखाचा घास

सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँड या राज्यांचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे.  शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांच्या हवाल्याने ANI ने हे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते. त्यांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे.

एक धीरोदात्त आणि समस्यांची उकल करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नैराश्याला कंटाळून आत्महत्या करणं हा आम्हा सगळ्यांसाठी धक्का आहे अशी प्रतिक्रिया शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी दिली आहे. अश्वनी कुमार हे १९७३ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ऑगस्ट २००६ ते २००८ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते.  ह्या पदावर काम करत असताना त्यांनी मोठ्या सुधारणा केल्या. त्यांनी हिमाचल प्रदेशच्या पोलिसांचे डिजिटलायझेशन आणि स्टेशन स्तरावर संगणकाचा वापर सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीतच तक्रारींची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. यामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना पोलिस ठाण्यात धाव घेण्यास येणाऱ्या अडचणी कमी झाल्या.

यानंतर त्यांच्यावर सीबीआयच्या संचालक पदाची धुरा सोपवण्यात आली. ऑगस्ट २००८ ते २०१० पर्यंत ते या पदावर होते. सीबीआय संचालक म्हणून काम करणारे अश्वनी कुमार हे हिमाचल प्रदेशातील पहिले पोलिस अधिकारी होते. त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ते या पदावर होते.

अश्वनी कुमार हे अत्यंत शालीन, मितभाषी आणि गंभीर स्वभावाचे होते;

मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असे. सीबीआयचे संचालक म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हायप्रोफाइल केसेस त्यावेळी सीबीआयकडे आल्या होत्या. त्याकाळी प्रचंड गाजलेले प्रकरण म्हणजे आरुषी हत्याकांड. या प्रकरणाचा तपास जेव्हा त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता तेव्हा नोकराविरोधात त्यांना चार्जशीट फाईल करू देण्यापासून रोखण्यात आले होते. नंतर आरुषी प्रकरण त्यांच्याकडून काढून घेऊन एका नव्या टीमला देण्यात आलं. अश्वनी कुमार यांनी आरुषी प्रकरणात दिलेला अहवाल आणि नंतरच्या टीमने दिलेला अहवाल यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. त्यामुळे सीबीआयच्या संचालकपदी त्यांना नेमलं जाणं हे अनेकांसाठी धक्का देणारंच ठरलं होतं.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »