fbpx
Friday, October 22, 2021

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त : जाणून घ्या गांधीजींचे प्रेरणादायी विचार..!

मुंबई, 02 ऑक्टोबर : आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahtma Gandhi) यांची जयंती आहे . महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात (Gujarat) मधील पोरबंदर (Porbandar) येथे झाला. 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन देशभर ‘गांधी जयंती’ म्हणून साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या दिवशी गांधीजींचे स्मरण केले जाते. गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रमुख राजकीय नेते दिल्लीतील राजघाट येथील गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतात. पुष्पचक्र अर्पण करतात. सरकारी कार्यालयांमध्ये गांधींजींच्या प्रतिमेला हार घालून गांधीजींच्या पवित्र स्मृतीस वंदन केले जाते.  तसंच गांधी जयंती निमित्त संपूर्ण देशात ‘ड्राय डे’ पाळला जातो. यंदा कोरोना व्हायरस संकट असले तरी अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे पालन करुन ‘गांधी जयंती’ साध्या स्वरुपात देशभरात साजरी केली जात आहे .

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी विचार :-

‘आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि तेव्हा तुम्ही जिंकाल.’महात्मा गांधी

एका राष्ट्राची संस्कृती लोकांच्या मनात आणि आत्म्यात वसते.
– महात्मा गांधी

देशाची महानता आणि त्याच्या नैतिक प्रगतीचा अंदाज आपल्याला तेथील प्राण्यांशी होणाऱ्या व्यवहाराने येऊ शकतो.
– महात्मा गांधी

तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं; पण तुम्ही काहीतरी काम करणं, हे सर्वात महत्त्वाचं असतं.
– महात्मा गांधी

प्रसन्नता हे एकमेव असं अत्तर आहे, जे तुम्ही दुसऱ्यांवर शिंपडलं की त्याचे काही थेंब तुमच्या अंगावरी पडतात.
– महात्मा गांधी

असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे.
– महात्मा गांधी

कोणी भेकड प्रेम करू शकत नाही, प्रेम करणं हे शौर्याचं प्रतिक आहे.
– महात्मा गांधी

तर हे होते सत्य आणि अहिंसेचे व्रत जन्मभर जपणाऱ्या गांधीजींचे  काही निवडक  प्रेरणादायी विचार . भारताचा स्वातंत्र्य लढा देखील त्यांनी याच मार्गाने दिला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव देशातील नव्हे तर परदेशातील अनेकांवर पडला. आज गांधी जयंती निमित्त त्यांचे हे  काही प्रेरणादायी विचार आपण नक्कीच आचरणात आणण्याचा  प्रयत्न करू.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »