fbpx
Saturday, October 23, 2021

आजी-आजोबांच्या सहवासाचे फायदे माहीत आहेत का?

आजी-आजोबा बनणं ही म्हाताऱ्या माणसांसाठी सुखाची परमावधी असते. घरातील लहान मुलांचे लाड आणि हट्ट सर्वात जास्त पुरवले जातात ते आजी-आजोबांकडे. उगाच नाही नातवंडांना दुधावरची साय म्हणत! हल्लीच्या काळात जिथे आई-वडिल दोघेही नोकरी करत असतात तिथे मुलांकडे लक्ष देण्याचं काम अनेकदा आजी-आजोबांकडे असतं आणि त्यातूनच अनेक ठिकाणी मुलं आणि आजी-आजोबा यांना एकमेकांचा चांगलाच लळा असतो.

पण तुम्हाला माहित आहे का आजी- आजोबांसोबत राहताना मुलांचं व्यक्तिमत्त्व किती अंगांनी बहरत असतं… चला तर जाणून घेऊ या मूल आजी-आजोबांसोबत राहिल्याने त्याला काय लाभ होतात?

स्मरणशक्ती वाढते

एका अभ्यासानुसार, जे आजी-आजोबा आठवड्यातून एकदा तरी आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवतात त्यांना स्मृतीभंशाचा धोका फार कमी असतो. हे काही खास क्षण स्मरणात ठेवणं त्यांना फार सोपं जातं. मुलांसोबत खेळत असताना लहान मुलं जे अनेक छोटे छोटे प्रश्न त्यांना विचारतात, त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आजी-आजोबा आपोआप स्मरणशक्तीला ताण देण्याचा आणि गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करु लागतात. यामुळे त्यांची स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.

मानसिक आरोग्य सुधारतं 

नातवंडांसोबत खेळल्याने किंवा त्यांना नुसतं पाहूनही आजी-आजोबांचं मन किती आनंदून जातं! या आनंदामुळे आणि हसण्यामुळे त्यांचं मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं. म्हातारपणात सहसा मुलं लांब गेल्याने किंवा अति व्यस्त झाल्याने एकटं वाटू शकतं, पण नातवंडांसोबत राहिल्याने दु:खांचा विसर पडतो आणि त्यांच्या सानिध्यात वृद्ध माणसं आनंदी, सुखी, हसरं आयुष्य जगू शकतात.

दीर्घायुष्य लाभतं

जे आजी-आजोबा आपल्या नातवंडांसोबत जास्त काळ जीवन व्यतीत करतात त्यांना दीर्घायुष्य लाभतं. त्यामानाने एकट्या राहणा-या जोडप्यांचं आयुष्यमान थोडं कमी असतं. मात्र तरुणांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी वृद्ध व्यक्तींवर त्यांच्या मनाविरुद्ध लादू नये, कारण कधीकधी ही आनंददायी गोष्ट त्यांच्यासाठी स्ट्रेसचं कारण बनू शकते.

मुलांना होणारा फायदा

आजी-आजोबांसोबत राहणारी मुलं मानसिकदृष्ट्या खंबीर आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असतात. ती खेळकर आणि आत्मविश्वासू, गोष्टी लवकर आत्मसात करणारी असतात.

पुस्तक वाचून पोपटपंची करणारी व्यक्ती अनुभवी व्यक्तीच्या कैक पटीने मागे असते. अनुभवाने मिळणारं शिक्षण हे चिरंतन काळासाठी आपल्यासोबत असतं. आजी-आजोबांच्या इतकं समृद्ध ज्ञान जगातील कोणतीच शाळा देऊ शकत नाही.

त्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य उज्जवल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल की तर त्यांना आजी-आजोबांचा सहवास जास्तीत जास्त मिळू द्या.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »