fbpx
Saturday, November 27, 2021

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर; मुख्यमंत्र्यांनी उर्मिलाला फोन केल्याची चर्चा!

 

मुंबई, 30 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच केली जाणार आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या या 12 नावांवर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP आणि काँग्रेस (Congress) हे तिन्ही पक्ष जोरदार खल करताना दिसत आहेत. त्यामुळे दररोज नवी नावे चर्चेत येत आहेत. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचे नाव चर्चेत आहे. पण हे नाव काँग्रेस पक्षाकडून नव्हे तर शिवसेनेकडून चर्चेत आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच उर्मिला यांना फोन केल्याची चर्चा आहे. शिवसेना अथवा उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मात्र याबाबत अधिकृत माहिती पुढे आली नाही.

विधानपरीषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आले होते. परंतू, विधानपरिषदेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे उर्मिला यांनी काँग्रेसला कळवल्याचे समजते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वत: उर्मिला यांना फोन केल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

– अवघ्या सहा महिन्यात काँग्रेसला सो़डचिठ्ठी:

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या. राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »