fbpx
Saturday, October 23, 2021

मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंचा टेनिस कोर्टमधला ‘हा’ फोटो सोशल मीडियात होतोय तुफान व्हायरल!

 

मुंबई, 13 नोव्हेंबर : ‘जो फिट तोच हिट’ हे सूत्र  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच राजकारणाच्या दगदगीतही ते फिटनेससाठी पुरेसा वेळ देतात . काही दिवसांपूर्वी  राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा टेनिस कोर्टवरील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आज राज यांचा आणखी एक ‘कडक’ फोटो मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोवर लाइक्सचा वर्षाव होत असून सोशल मीडियात राज यांचा हा फोटो तुफान  व्हायरल होत आहे .

गेले काही दिवस राज ठाकरे  घराशेजारच्याच शिवाजी पार्क जिमखान्यात टेनिस कोर्टवर ते घाम गाळताना दिसत आहेत. राज हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच क्रीडाप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्याचा प्रत्ययही अनेकदा आलेला आहे. आता याच क्रीडाप्रेमातून त्यांनी फिटनेससाठी टेनिसचा मार्ग निवडला आहे. सध्या ते नियमितपणे टेनिस खेळत आहेत. आज मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर राज यांचा एक ‘कडक’ फोटो पोस्ट केला असून त्यात राज यांच्यातील स्पोर्ट्समनची पुन्हा एकदा झलक दिसली आहे.

सर्वांनाच आपल्या रुबाबदार बाण्याने भुरळ घालणारे राज हे गॉगल घालून ऐटीत खुर्चीत बसले आहेत आणि चहाचे झुरके घेत आहेत, असा हा फोटो आहे. ‘शिवाजी पार्क, दादर’ असे लोकेशनही त्यात देण्यात आले आहेत. ‘स्पोर्ट्समन’ राज ठाकरेंचा हा फोटो मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर शेअर केला असून फोटोवर लाइक्सचा पाऊस पडताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी काहीही केलं तरी ते खास आणि लक्षवेधीच असतं, असं त्यांचे विरोधकही मान्य करतात. म्हणूनच राज यांच्यातला राजकारणी आणि खेळाडू या दोन्हीला तितकीच दाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि त्यांचं कृष्णकुंज निवासस्थान गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. कोणताही प्रश्न असला तरी तो फक्त आणि फक्त ‘राज’मार्गाने सुटतो, असा दावा हल्ली त्यासाठीच मनसैनिक करताना दिसत आहेत. कोळी बांधव, वारकरी, नाट्यकलावंत, खासगी क्लासचालक अशी अनेक शिष्टमंडळं अलीकडे कृष्णकुंजवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. या शिष्टमंडळांना मोघम आश्वासने न देता राज तिथूनच थेट सरकारमधील संबंधित मंत्र्याशी संवाद साधतात व प्रश्नाची तड लावतात, हा अनुभवही या सर्वांनी घेतला आहे

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »