fbpx
Saturday, October 23, 2021

शॉक दिल्याशिवाय सोमय्याची बेताल बडबड थांबणार नाही; गुलाबराव पाटलांची जहरी टीका!

 

 

जळगाव,13 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत . या आरोपानंतर शिवसेना आक्रमक झाली असून किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

एका मराठी वर्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा घणाघाती हल्ला केला. किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे, अशी सडकून टीका गुलाबराव पाटलांनी सोमय्यावर केली आहे .

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »