fbpx
Saturday, October 23, 2021

जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; म्हणाले खेळ आता सुरु झालाय!

मुंबई ,12 नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे  (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर काल (11 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी पुन्हा  हल्लाबोल केला. रिपब्लिक चॅनलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामी यांनी सांगितले की, ‘उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय. असं त्यांनी सांगितले .

तर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्याला झालेली अटक ही ‘अवैध’ असल्याचं सांगत अर्णब गोस्वामी यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही खोचक  टीका केली आहे . अर्णब गोस्वामी म्हणाले की, ‘तळोजा कारागृहात त्यांची पोलिसांनी तीन टप्प्यांत चौकशी केली. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही.’ ते म्हणाले की, ‘खेळ आता सुरु झाला आहे.’ गोस्वामी म्हणाले की, ‘ते प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरु करणार आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही त्यांची उपस्थिती आहे.’

पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवत अर्णब गोस्वामी म्हणाले की, ‘मी कारागृहातूनही चॅनल सुरु करणार आणि तुम्ही (ठाकरे) काहीच करू शकणार नाही.’ तसेच गोस्वामी यांनी अंतरिम जामीन दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. दरम्यान अर्णब गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तळोजा कारागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अर्णब यांनी गाडीबाहेर येऊन चाहत्यांना हात दाखवत ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या इतका जोश पाहायला मिळाला.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »