fbpx
Saturday, October 23, 2021

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी वंचितकडून ‘या’ चार उमेदवाराची नावं जाहीर!

 

औरंगाबाद, 11 नोव्हेंबर : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. 1 डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. नुकतंच वंचित बहुजन आघाडीनेकडूनही या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात औरंगाबाद, पुणे आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकांसाठी वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी वंचितने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

– पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी वंचितचे उमेदवार:

पदवीधर मतदारसंघ

नागोराव पांचाळ -औरंगाबाद
सोमनाथ साळुंखे – पुणे
राहुल वानखेडे – नागपूर

शिक्षक मतदारसंघ

सम्राट शिंदे – पुणे –

दरम्यान, नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे. तर भाजपकडून नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »