fbpx
Saturday, October 23, 2021

अर्णवला मोबाइल पुरवणे पडले महागात; कारागृहातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

 

मुंबई , 11 नोव्हेंबर :  रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना महाराष्ट्र पोलिसांनी 4 नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली असून त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं आहे.  तर कारागृहात असताना  अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरविल्याची बाब दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, त्यांना मोबाईल फोन पुरविल्याप्रकरणी दोन कारागृह पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खातेनिहाय चौकशी नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर तिघांनाही अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कारागृहाच्या विलगीकरण कक्षात अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याची बाब समोर आली होती. यानंतर तीनही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. इतर कैद्याकडेही याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी कारागृहातील दोन पोलीस पैसे घेऊन त्यांना स्वताचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समोर आले. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधिक्षक ए.टी. पाटील यांनी सांगितले आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »