fbpx
Saturday, October 23, 2021

रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट!

 

मुंबई ,11 नोव्हेंबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा खोचक  सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले  आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

– भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी नेमके काय आरोप केले?

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी वास्तू सजावटकार अन्वय मधूकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक आणि आज्ञा अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळच्या किल्ला कोर्लई परिसरात जमीन घेतली. या ठिकाणापासून २ किलोमीटर अंतरावर माझी सासरवाडी आहे. त्यामुळे मला त्या जागेचं महत्व आपल्याला माहिती असल्याचं किरिट सोमय्या म्हणाले. 21 मार्च 2014 रोजी ठाकरे परिवाराकडून नाईक कुटुंबियांना 2 कोटी 20 लाख रुपये याव्यवराहाबाबत देण्यात आहे. हा व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का सांगितला नाही? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? रेवदंडा परिसरात ठाकरे कुटुंबियांनी जमीन घेण्याचं कारण काय? अजून किती जमिनी घेतल्या गेल्या आहेत? असे प्रश्न किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. या व्यवहारातील सातबारा हा संयुक्त आहे. नाईक परिवाराचं आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर हे दोघांनी मिळून हा व्यवहार का केला? हे दोघे कसे एकत्र आहे? असे प्रश्न विचारतानाच या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणीही किरिट सोमय्या यांनी केली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »