fbpx
Saturday, November 27, 2021

बिहारसह 11 राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश; यावरून देशात मोदी लाट कायम असल्याचे सिद्ध – फडणवीस

 

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीसह देशभरातील 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये NDA ने आघाडी घेत घसघशीत विजय मिळवला. यावरुन देशात अजून मोदींची लाट कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. या यशानंतर देशासह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये NDA ची सत्ता पुन्हा आल्याने सर्व जनतेचे आभार मानत येथील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वासाची लहर अजूनही कायम आहे असेही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

बिहारच्या जनतेने हे दाखवून दिले की त्यांना राज्यात विकास हवा आहे, जंगलराज नाही. आपले पंतप्रधान नोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोहर लागली गेली आहे. नितीशकुमारांवर जनेतेने आपल्या विश्वास कायम ठेवल्याने मी त्यांचे आभार मानतो’ असेही देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपने बिहारमध्ये 110 जागांवर निवडणूक लढली. यापैकी जितक्या जागांवर विजय मिळाला त्याचं प्रमाण 67 टक्के इतकं आहे. हे प्रमाण 2015 च्या निवडणुकीत फक्त 34 टक्के होतं. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीचं गरिब कल्याण अजेंडा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जातं. मी भाजपच्या बिहारच्या टीमचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.

तर देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. बिहारसह या राज्यांमध्येही पंतप्रधान मोदींवर विश्वासाची लहर आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगना तसेच इतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »