fbpx
Saturday, November 27, 2021

बोंड अळीचा आणखी एक बळी; पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यात 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

 

अमरावती , 7 नोव्हेंबर : अगोदर बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस कुठे जास्त  पाऊस त्यात कपाशीवर आलेली बोंडअळी तर सोयाबीन वर आलेला खोडकिडी त्यामुळे शेतकरी मोठया संकटात सापडला असून या विवंचनेतुन  मागील दहा महिन्यात  पश्चिम विदर्भात 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे . या आत्महत्यांचं सत्र सुरु असतानाच आता पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील ममदापुर या गावातील देवराव सांभारे या 53  वर्षीय शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

शेतकरी देवराव भाऊरावजी सांभारे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी यावर्षी दोन एकर सोयाबीन आणि दोन एकर कपाशीची लागवड केली होती. यात खोडकिडा आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे केवळ त्यांना तीन क्विंटल सोयाबिन झाले आणि तेही खराब त्यानंतर आता त्याची भिस्त होती कपाशीवर यात मात्र कपाशीवरही बोंड अळी आल्याने कपाशी पार सडली. त्यामुळे हाताचे दोन्ही पीक गेल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा लोकांचे पैसे बँकेचे कर्ज कसं फेडायचे  ?अशा विविध संकटाच्या गर्तेत ते अडकून पडले होते. त्याच विवंचनेत त्यांनी घरी येऊन गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »