fbpx
Saturday, October 23, 2021

आरोग्यमंत्री कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार; राजस्थान,ओदिशापाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी होण्याची शक्यता!

 

मुंबई, 5 नोव्हेंबर : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे ही मागणी करणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट घोंघावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका मांडणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे .

फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून, फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्याठिकाणी रुग्णालय स्तरावरच डेथ ऑडिटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी संगितले.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »