fbpx
Saturday, October 23, 2021

corona virus: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण!


 

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : वैश्विक महामारी असलेल्या करोना विषाणूचा धोका सर्वसामान्यांपासून ते राजकारण, क्रीडा चित्रपट तसेच इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांमधील लोकांना जाणवू लागला असताना आता अशातच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. चिरंजीवी यांनी कोरोनाची पोस्ट टाकल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

चिरंजीवी यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘आचार्य चित्रपटाच्या चित्रीकरणापुर्वी कोरोनाची चाचणी केली असता त्यात माझा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून, तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्लानुसार मी क्वारंटाईन होत आहे. मागील 4-5 दिवासांमध्ये माझा संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’ असे आवाहन चिरंजीवी यांनी केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »