fbpx
Friday, October 22, 2021

अभिनेता मिलिंद सोमणला न्यूड फोटो शूट करणं पडलं महागात; गोव्यात सोमणविरोधात  गुन्हा दाखल!

पणजी, ७ नोव्हेंबर : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला न्यूड फोटो पोस्ट करणं चांगलंच महागात पडलं असून न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गोव्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिलिंद सोमणनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक धावत असतानाचा एक न्यूड फोटो शेअर केला होता. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली. मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

दरम्यान, मिलिंद सोमण याने न्यूड फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियात त्याची खिल्ली उडवली गेली. नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया ही दिल्या. असे काहीही असो पण मिलिंद सोमण हा नेहमीच एक फिटनेस पर्सानिलिटी म्हणून चर्चेत असतो. ऐवढेच नाही तर त्याची आई आणि बायको अंकिता कंवर सुद्धा त्याला यामध्ये साथ देताना बहुतांश वेळा दिसून येतात.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »