fbpx
Saturday, October 23, 2021

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता एडी हेसलची प्रेयसीच्या दाराबाहेरच गोळ्या घालून हत्या!

 

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : ‘द किड्स् आर ऑल राइट’ या सुपरहिट चित्रपटामुळे नावारुपास आलेला हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता एडी हेसलची (Eddie Hassell) गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना टेक्सास (Texas) येथे शनिवारी मध्यरात्री घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एडी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला असताना 2 अज्ञात व्यक्तींना त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एडीच्या मृत्यूमुळे हॉलिवूड मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी टेक्सास पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

एडी हेसल हा 30 वर्षांचा असून तो शनिवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. प्रेयसीच्या दरवाज्यात असताना 2 अज्ञात व्यक्ती मोटारसायकल बसून त्याच्याजवळ आले. त्यानंतर त्यांनी एडीच्या पोटावर गोळ्या झाडल्या. दरम्यान, एडी दरवाज्यात विव्हळत पडल्याचे त्याच्या प्रेयसीने पाहिल्यानंतर त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डेडलाईनने आपल्या वृत्तात दिली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »