fbpx
Saturday, November 27, 2021

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल,त्यांनतर  दोषींवर कडक कारवाई करणार –  अजित पवार

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल,त्यांनतर  दोषींवर कडक कारवाई करणार –  अजित पवार
पुणे, 5 सप्टेंबर : टीव्ही ९  मराठी वृत्तवाहिनीचे पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाचा संसर्ग आणि
उपचारांदरम्यान वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध येऊ न शकल्याने पुण्यात निधन झाल होत.  त्यावर बोलताना  आज
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येणार आहे. हा अहवाल
आल्यानंतर याप्रकरणी जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अस अजित पवार यांनी यावेळी
बोलताना सांगितल .   पुढे ते म्हणाले, आपल्यातील एक पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद
घटना घडली. ती घटना घडल्यानंतर मी मीडियासमोर आलो नाही. मात्र, मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि
महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या. याबाबत चौकशी झाली पाहिजे. ससूनच्या टीमला त्याची जबाबदारी दिली आहे.
त्याचा अहवाल सोमवारी येईल,” अशी माहिती अजित पवारांनी दिली. तर पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत
आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आज पवारांनी बैठक घेतली. या
बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर पुण्याच्या जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक
तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्बो सेंटरमध्ये स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे
की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. तसेच जम्बो सेंटरमध्ये कॅमेरा लावणार
आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले. तर “नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. जवळपास 25 ते 30 टक्के
नागरिक मास्क वापरत नाही. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवलंच पाहिजे, मास्क वापरलंच पाहिजे.
वेळोवेळी सॅनिटायझर किंवा स्वच्छा हात धुणं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण काही जणांना याची फारसी गरज
वाटत नाही, असेही अजित पवार म्हणाले. तर ऑक्सिजनचा हवा तसा पुरवठा नाही. आज सकाळीच याबाबत चीफ
सेक्रेटरींशी बोललो. राजेश टोपेंनी काल याच्यावर बैठक घेतली. ऑक्सिजन तयार करणारे कारखाने औद्योगिक कारणासाठी
ऑक्सिजन दिलं जातं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आधी दिलं पाहिजे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश
जावडेकर यांना सांगितलं आहे. ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून काही विपरीत घडू नये. त्यामुळे आम्ही जावडेकरांना
सांगितलं आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले.रुग्णवाहिकेबद्दल माहिती मिळावी, याची सुविधा केली असल्याचही
अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितल.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »