fbpx
Saturday, November 27, 2021

हाथरस प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर आक्रमक; संघ आणि भाजपावर केली जहरी टीका..!

पुणे , 5 ऑक्टोबर :  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरस जिल्ह्यात (Hathras district) एका दलित तरुणीवर झालेल्या  सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून सध्या देशातील  राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . यावरून विरोधी पक्षांनी योगी सरकारला धारेवर धरले असून, मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर देखील निशाणा साधला आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर पुण्यात म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

सर्व स्तरातून हा निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्टं असं मी मानतो. तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. आरएसएस-भाजपा हे महिला उपोभगण्याची वस्तू आहेत, असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीने असलेली माणसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.” असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलं. तसेच, “पीडित कुटुंबाकडून जे काही आरोप केले जात आहेत.

पोलीस किंवा एसआयटी त्यांना सूचना असल्याशिवाय स्वतःहून कधीही धमकावू शकत नाही. त्यांना या सूचना कोण देणार? तर राजकीय नेतृत्वच त्यांना या सूचना देणार. म्हणूनच त्या कुटुंबाने जी मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने एका न्यायाधीशाची नेमणूक केली जावी आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली ही चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळेल. या मागणीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत.” असंही आंबेडकर  यांनी  यावेळी बोलताना  सांगितलं. तर पुढे ते म्हणाले,  मोदींनी मुरादबादमधील दंगलीबाबतही काही बोलले नाही, हा मौनी बाबा आहे. अशी खोचकी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

हाथरस प्रकरण:

14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांनाही पीडित कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले. तसेच प्रशासनाने माध्यमांशी गैरवर्तन केल असून अनेक वर्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना  हाथरस येथे भेट देण्यापासून रोखलं जात आहे . हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी चौकशी नेमली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »