fbpx
Saturday, November 27, 2021

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर: महापारेषण मध्ये लवकरच तब्बल 8500 पदांसाठी भरती!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर: महापारेषण मध्ये लवकरच तब्बल 8500 पदांसाठी भरती!

मुंबई, 24 ऑक्टोबर : सरकारी नोकरी शोधताय? तर मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत नोकरभरती करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. महापारेषण कंपनीत तांत्रिक विभागात तब्बल 8500 पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार असून लवकरच भरती प्रक्रीयेला सुरुवात होईल. 8500 पदांपैकी तांत्रिक विभागात 6750 तर अभियंता म्हणून 1762 पदं भरली जाणार आहेत.

यामुळे लॉकडाऊन काळात आलेले बेरोजगारीचे संकट दूर करण्याची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.या भरती प्रक्रीयेत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. तसंच अभियांत्रिकी पदवीधारकांनासाठीही ही चांगली संधी आहे. महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव सादर केल्यानंतर पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे 2005 साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाले. त्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेली. मात्र नोकरभरती करण्यात आली नाही. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला. त्यामुळे आता रिक्तपदं भरण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »