fbpx
Saturday, October 23, 2021

दिलासादायक: देशात गेल्या २४ तासात करोनाबाधितांंपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक!

 

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर : करोना व्हायरसचे देशासह राज्यातील वाढते  थैमान आता  कमी होताना दिसत असून करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची  गती आता  मंदावली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात नव्या करोना  बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील २४ तासांत ४४,२८१ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर ५०,३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत देशात ४४,२८१ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ८६,३६,०१२ वर पोहोचली आहे. तर ५१२ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. यामुळे आजवर एकूण १,२७,५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात सध्या ४,९४,६५७ अॅक्टिव्ह करोनाचे रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत ६,५५७ रुग्णांचे करोना अहवाल निगेटिव्ह आहेत आहेत. तसेच देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८०,१३,७८४ वर पोहोचली असून गेल्या चोवीस तासांत ५०,३२६ नव्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »