fbpx
Saturday, November 27, 2021

Arnab Arrest Case: अर्णब गोस्वामी यांची मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाइन सेलमध्ये रवानगी!

 

मुंबई, 5 नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अटक केली असून,  त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारी रात्री दिले आहेत . यानंतर तिनही आरोपींची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेल मध्ये करण्यात आली आहे. 40 अन्य कैद्यासमवेत या तिघांना ठेवण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगर पालिकेच्या शाळा इमारतीत क्वारंटाईन सेल स्थापन केला आहे. या क्वारंटाईन सेलमध्ये कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर याच क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन होत नाही तोवर याच क्वारंटाईन सेल मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. तिघांनाही क्वारंटाईन सेलच्या एक नंबर रुममध्ये ठेवण्यात आले आहे. इतर कैद्यांसमवेत त्यांना कारागृहात शिजवलेले अन्न, पाणी घ्यावे लागणार आहे. दरम्यान, या क्वारंटाईन सेल परीसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »