fbpx
Saturday, October 23, 2021

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत भाजपात जाणार; एका भेटीमुळे चर्चांना उधाण!

 

चेन्नई , 2 नोव्हेंबर : गेल्या चार दशकांपासून बॉलिवुड आणि टॉलिवुडचा ‘बॉस’ म्हणून आपला दरारा कायम राखणारा अभिनेता रजनीकांत भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारणात उतरू शकतो, अशा चर्चांना आता पुन्हा एकदा तामिळनाडूत उधाण आलंय. आणि या चर्चांना उधाण येण्याचं कारण ठरलय, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक (RSS) आणि ‘थुघलक’ या तमिळ मासिकाचे संपादक स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी रविवारी सायंकाळी रजनीकांत यांची घेतलेली भेट. या एका भेटीमुळे रजनीकांत भाजपमध्ये दाखल होण्याच्या चर्चांना ऊत आल्याचं दिसून येत आहे .

रजनीकांत यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. रजनीकांत आणि गुरुमूर्ती यांच्यात यादरम्यान जवळपास दोन तास चर्चा झाली. रजनीकांत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचं दोघांकडून सांगण्यात आलं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलंय. या भेटीसाठी साधलेली वेळही अत्यंत महत्त्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘रजनीकांत यांना राजकारणात उज्ज्वल भविष्य आहे. त्यांचं भाजपसोबत येणं ही राज्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरू शकते’ असं या अगोदर गुरुमूर्ती यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी करोना व्हायरस आणि आजारापणाचं कारण देत राजकारणात एन्ट्रीच्या चर्चांना ब्रेक लावला होता. तसंच सोशल मीडियावर रजनीकांत यांचं एक पत्रंही व्हायरल झालं होतं. या पत्रात, आजारपणामुळे राजकारणापासून लांबच राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे पत्र फेक असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पत्रात माझ्या आरोग्यासंबंधी आणि माझ्या डॉक्टरांकडून मला देण्यात आलेला सल्ला खरा होता. मात्र हे माझं अधिकृत वक्तव्य नाही, मी रजनी मक्कल मंदरमच्या सदस्यांशी विचार-विनिमय करून आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल माहिती देईल’ असं रजनीकांत यांनी त्यावेळी स्पष्ट केल होत .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »