fbpx
Saturday, November 27, 2021

पंतप्रधान मोदी आज जगभरातील बड्या उद्योजकांशी साधणार संवाद!

 

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा 20 देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वरिष्ठ अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातील नियामकही या बैठकीला उपस्थित राहतील. भारतातील अनेक मोठे उद्योजकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, नंदन नीलेकणी, उदय कोटक, दीपक पारेख आदी उद्योजकांचा समावेश असणार आहे.

या बैठकीत प्रामुख्याने भारताचं 5 हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य, आर्थिक सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद 2020 चं आयोजन अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF)कडून करण्यात आलं आहे. शासकीय मालमत्ता निधी आणि निवृत्तीवेतन निधीसह जगभरातील सर्व प्रमुख गुंतवणूकदार या बैठकीत सहभागी असणार आहेत.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »