fbpx
Saturday, October 23, 2021

बिहारचे नवे मुख्यमंत्री नीतीश कुमारच, याबद्दल कोणताही संभ्रम नाही – सुशीलकुमार मोदी

 

पाटणा, ११ नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी बहुमताचा जादुई १२२ आकडा गाठला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय .मात्र पुन्हा एकदा नीतीश कुमार (Nitish Kumar) हेच एनडीचे (NDA) मुख्यमंत्री बनतील का? याबाबद संभ्रम दिसून येत होता . मात्र आता यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे .

नीतीश कुमार हेच एनडीचे मुख्यमंत्री असतील असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे ७४ जागा जिंकत राज्यातील दुसरा मोठा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) स्पष्टपणे म्हटले आहे. यावर कोणताही संभ्रम नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे. नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील, कारण ही आमची वचनबद्धता होती. यामध्ये कोणताही संभ्रम नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी म्हटले आहे. निवडणुकांमध्ये असे होत असते. काही अधिक जागा जिंकतात, काही कमी. मात्र आम्ही समान भागीदार आहोत, असेही मोदी पुढे म्हणाले. नीतीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाहून अधिक जागा जिंकल्याच्या एका दिवसानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे वक्तव्य आले आहे.

दरम्यान, आघाडीमध्ये मोठ्या भावाचा दर्जा हिरावून घेतल्यानंतर देखील नीतीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री होणार की नाही?, याबाबतची चर्चा सुरू झाली होती. अनेक लोक याबाबत प्रश्न विचारू लागले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने याचे उत्तर देत सर्वांची तोंडे बंद केली आहेत.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »