fbpx
Saturday, October 23, 2021

अर्णब गोस्वामीला पाठिंबा देताय की फुकटची जाहिरात करुन घेताय; कुणाल कामराचा भाजपला टोला!

 

मुंबई, 6 नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना महाराष्ट्र पोलिसांनी 4 नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. या अटकेवरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा रिपब्लिक टीव्हीवर फ्रीमध्ये जाहिरात करुन घेतय” असा खोचक टोला त्याने लगावला आहे. कुणाल कामरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो आपल्या अनोख्या विनोदी शैलीत भाष्य करतो.

यावेळी त्याने अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “अर्णब गोस्वामी यांना अटक होताच त्यांचे समर्थक भाजपा आणि एबीवीपीचे झेंडे घेऊन रिपब्लिक वृत्तवाहिनीवर येऊ लागले. भाजपा रिपब्लिक टीव्हीवर स्वत:ची मोफत जाहिरात करुन घेत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कुणालने उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

– काय आहे अन्वय नाईक प्रकरण?

पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »