fbpx
Saturday, October 23, 2021

पाकच्या नापाक कुरापती सुरूच; LOC वर गोळीबार, 2 जवान शहीद तर तीन नागरिकांचा मृत्यू!

 

श्रीनगर, 13 नोव्हेंबर : संपूर्ण जग कोरोनाशी लढतय मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. आज पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारताच्या दोन सैनिकांसह तीन नागरिकांची मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय सैन्य सर्व क्षेत्रांमध्ये चोख प्रत्युत्तर देत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील इझमर्ग येथे युद्धविराम कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. काही मिनिटांनंतर कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील सावजीन भागातही पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला. आज सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या बाजूला असलेल्या चार सेक्टरच्या सीमाभाग आणि चौकींवर पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला. या महिन्यात आतापर्यंत पाकिस्तानी सैनिकांनी 24 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »