fbpx
Saturday, October 23, 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो का हटवला? ट्विटरने  सांगितलं  कारण!

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटरवरील अकाउंटच्या डीपीमध्ये अचानक झालेला बदल पाहता सर्वांच्या  भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण त्यांचा प्रोफाइल फोटो काही वेळासाठी गायब झाला होता. कारण अमित शहा यांचा जो फोटो डीपीवर होतो तो कॉपीराइट असल्याचा कोणीतरी दावा केला गेला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा प्रोफाइल फोटो रिस्टोर करण्यात आला होता. यावर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अनावधनाने ही चूक झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “त्रुटीमुळे ग्लोबल कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत ट्विटर तात्पुरतं लॉक करावं लागलं होतं. तातडीने दुरुस्ती केली असून अकाऊंट आता पूर्ववत झालं आहे.” ‘कॉपीराइट होल्डरच्या रिपोर्ट’नुसार अमित शाह याचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काढला होता. ट्विटरवर त्यांचे 23.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर ब्लँक पेजसह “मीडिया नॉट डिस्प्लेड. कॉपीराईट होल्डरच्या अहवालानुसार हा फोटो हटवण्यात आला आहे. मात्र यानंतर अमित शाह यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला. परंतु ट्विटरने याबाबत आणखी माहिती शेअर केलेली नाही.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »