fbpx
Saturday, October 23, 2021

corona virus: भाजपाचे नेते खासदार साक्षी महाराज यांना करोनाची लागण!

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : वैश्विक महामारी असलेल्या करोना विषाणूचा धोका सर्वसामान्यांपासून  ते  राजकारण, क्रीडा चित्रपट तसेच इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांमधील  लोकांना जाणवू लागला असताना आता अशातच भाजपचे नेते  खासदार साक्षी महाराज हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना करोनाची काही लक्षणं जाणवू लागली ज्यानंतर त्यांनी करोनाची चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असंही साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.

तर खासदार साक्षी महाराज यांनी लोकांना आवाहन केलं आहे की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. करोनाची बाधा झाल्याने ते होम क्वारंटाइन असणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, देशात करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसला, तरी दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी करोनावर मात केली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »