fbpx
Saturday, November 27, 2021

शिवसेनेचे 23 उमेदवार बिहार निवडणुकीच्या रिंगणात; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला फटका बसणार का?

मुंबई, 26 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुक आता रंगदार झाली असून, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील शिगेला पोहोचलेला प्रचार आज थंडावणार आहे . बिहारमध्ये भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJD असा जोरदार सामना पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेनं आपले 23 उमेदवार बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरवले असल्यानं रंगत अजून वाढली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे तीन उमेदवार, दुसऱ्या टप्प्यात नऊ उमेदवार तर तिसऱ्या टप्प्यात 11 उमेदवार आपलं नशीब आजमावत असल्याचे दिसत आहे .

तर बिहारमधील शिवसेना उमेदवारांची यादी पाहिल्यास अजून एक बाब लक्षात येते. ती म्हणजे पालीगंज आणि मोरवा मतदारसंघात मनीष कुमार या एकाच नावाचे उमेदवार आहेत. तर संजय कुमार या एकाच नावाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ते चिरैय्या, फुलपराश आणि बेनीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुशांत प्रकरणावरुन राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची मोठी नाचक्की झाली. त्यामुळं भाजप आणि नितीश कुमार यांना शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी बिहारमध्ये शिवसेनेनं उमेदवार उतरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप उमेदवारांना त्याचा किती फटका बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

– बिहारमधील सेना उमेदवारांची यादी आणि मतदारसंघ:

पहिला टप्पा:

मनीष कुमार – पालीगंज
ब्युटी सिन्हा – गया शहर
मृत्युंजय कुमार – वजीरगंज

– दुसरा टप्पा:

संजय कुमार – चिरैय्या
संजय कुमार – फुलपराश
संजय कुमार झा – बेनीपूर
रंजय कुमार सिंह – तरैय्या
विनिता कुमारी – अस्थवां
रवींद्र कुमार – मनेर
जयमाला देवी – राघोपुर
विनोद बैठा – भोरे
शंकर महसेठ – मधुबनी

– तिसरा टप्पा:

प्रदीप कुमार सिंह – औराई
शत्रूघन पासवान – कल्याणपुर
सुभाषचंद्र पासवान – बनमंखी
नवीन कुमार मल्लीक – ठाकूरगंज
नंद कुमार – समस्तीपुर
पुष्पांकुमारी – सराय रंजन
मनीष कुमार – मोरवा
शिवनाथ मल्लीक – किशनगंज
चंदन कु. यादव – बहादुरगंज
गुंजा देवी – नरपरगंज
नागेंद्र चंद्र मंडल – मनिहारी

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »