fbpx
Saturday, November 27, 2021

बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत NDA चा विजय; नितीश कुमारांना मोठा झटका तर तेजस्वी लहर कायम!

 

पाटणा, 11 नोव्हेंबर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या  बिहार निवडणूकीची  मतमोजणी  आज (11 नोव्हेंबर) पहाटे अखेर संपली असून निकाल स्पष्ट झाला आहे. बिहारच्या मतदारांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर राजद हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तास्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे 124 जागा मिळवलेल्या एनडीएला (NDA)आता सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा आहे. एनडीएमध्ये भाजपला (BJP) 74, जेडीयू (JDU) ला 43, मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला तगडी टक्कर देणार्‍या महागठबंधनला (Mahagathabandhan) 110 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राजदने(RJD) बाजी मारत 75 जागा मिळवल्या आहेत तर कॉंग्रेसने (Congress) 19 आणि डाव्यांनी 16 जागांवर विजय मिळवला आहे. यासोबतच बिहारमध्ये ओवेसींच्या एमआयएमला 5, चिराग पासवासनच्या लोजद ला 1 आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले आहेत.

या निवडणूक निकालानंतर भलेही जदयूचे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील मात्र त्यांचा पक्ष जदयूला खूप मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे. 2015 साली 71 जागा जिंकलेल्या जदयूला यावेळी फक्त 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असलं तरी पक्षपातळीवर नितीशकुमारांचं मोठं नुकसान झालं आहे.

– कोणत्या पक्षाला किती जागा:

एनडीए-125
भाजप-74
जेडीयू-43
विकासशील इंसान पार्टी-04
हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04

महागठबंधन-110
आरजेडी-75
काँग्रेस-19
भाकपा-माले-12
सीपीएम-02
सीपीआय-02

एएमआयएम – 5
बहुजन समाज पार्टी – एक
लोक जनशक्ति पार्टी – एक
अपक्ष – एक

दरम्यान, यंदाची बिहार विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या निवडणूकीमध्ये राजद ने चमकदार कामगिरी केली आहे. या निवडणूकीत लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव  तेजस्वी यादव यांच्या कामगिरीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. सत्तांतर करू शकले नसले तरी राजद सर्वाधिक जागा मिळवणारा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »