fbpx
Saturday, November 27, 2021

दुर्देवी घटना: बिहारच्या भागलपूरमध्ये नाव पलटली, 5 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता!

 

भागलपूर, 5 नोव्हेंबर : बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाल्याची एक एक दुर्देवी घटना समोर आली आहे. भागलपूर-नवगछिया मधील करारी दियारा गावामध्ये नदीत नाव पलटी झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या अपघातात जवळपास 100 लोक अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या नावेमध्ये जवळपास 125 लोक होते. अचानक नाव पलटी झाल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी आहेत. तर अद्याप 100 लोक बेपत्ता आहेत.

या अपघातातील जखमींना उपचारासाठी गोपालपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत पाच मृतदेह हाती लागले आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार या नावेमध्ये मजूर, शेतकरी, लहान मुलं आणि काही महिला होत्या. जे आपल्या शेतांमध्ये कामासाठी गंगा नदीच्या पलीकडील बाजूला या नावेतून जात होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »