fbpx
Saturday, October 23, 2021

भारत-चीन यांच्यातील सीमा वाद निवळणार…

भारत-चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवरून गेल्या सहा महिन्यांपासूनचा असणारा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यामुळे, भारतीय लष्कराचे सुमारे ५० हजार जवान पूर्व लडाखमधील पर्वतीय भागांत अनेक ठिकाणी युद्धसज्ज ठेवण्यात आले होते. परंतु आता मात्र हा तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्य आणि शस्त्रे माघारी घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही देशांनी सर्वसाधारण सहमती दर्शवली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिल्याचे वृत्त आहे. करार झाल्यापासून एक दिवसाच्या आत सैनिकांची वाहतूक करणारी वाहने हटवणे, पँगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील ठरावीक भागांतून फौजा माघारी घेणे, तसेच दोन्ही बाजूंच्या सैन्यमाघारीची पडताळणी करणे या प्रमुख गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

सैन्याची माघार आणि एप्रिलमधील परिस्थिती पुन्हा बहाल करणे याबाबतच्या प्रस्तावाला ६ नोव्हेंबरला भारतीय व चिनी सैन्यात चुशुल येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीत अंतिम स्वरूप देण्यात आले. लष्करी चर्चेची नववी फेरी येत्या काही दिवसांतच होण्याचा अंदाज आहे.

दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या प्रस्तावावर कॉर्प्स कमांडर्सच्या पुढील चर्चेत करारावर स्वाक्षरी करण्याची भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांची तयारी असल्याचेही सूत्रांनी यावेळी सांगितले.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »