fbpx
Sunday, September 26, 2021

ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट पटकथाकार यशवंत रांजणकर यांचे निधन …..

ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट पटकथाकार यशवंत रांजणकर यांचे निधन …..
ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट पटकथाकार यशवंत रांजणकर (87) यांचे सोमवारी दुपारी पवई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, बहीण व नातवंडे असा परिवार आहे.
यशवंत रांजणकर 10 दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पवईतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची 50 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. ‘सर्जा ‘ या चित्रपटाची पटकथा व संवाद रांजणकर यांचे होते. त्यांनी ‘शापित’ चित्रपटाचे संवाद व ‘अर्धांगी’ चित्रपटाची पटकथा लिहिली होती. रांजणकर यांनी ‘धाकटी सून’, ‘आई पाहिजे’ अशा 10 ते 12 चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लेखन केले आहे.
‘अर्धांगी’ चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रांजणकर यांच्या ‘अपूर्व चित्रलेणी’, व ‘वॉल्ट डिस्ने यांचे चरित्र’ या पुस्तकांना पुरस्कार मिळाले होते. यशवंत रांजणकर यांनी बँकेत नोकरी केली; तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ग्रंथपाल म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अलीकडे त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’ या दिवाळी अंकांमधून लेखन केले. मागील वर्षी ‘हंस’ दिवाळी अंकासाठी त्यांनी संशोधनात्मक मोठा लेख लिहिला होता.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,959FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »