fbpx
Friday, October 22, 2021

चांगला विचार करा; आपण जो विचार करताे ताे सिद्ध हाेताे

चांगला विचार करा; आपण जो विचार करताे ताे सिद्ध हाेताे
साॅलोमन बेटाविषयी सांगितले जाते की, तेथे एखादे झाड ताेडायचे असेल तर कापून काढले जात नाही, तर त्याच्या
भाेवताली उभे राहून सारे जण त्याला शिव्या, दूषणे देतात, त्यामुळे हळूहळू झाड काेमेजते, सुकून जाते. त्यामुळेच असे
म्हटले जाते की, जाे विचार आपण करताे ताे सिद्ध हाेताे. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, आपण परमात्म्याच्या ऊर्जेचे
चहूबाजूंनी संरक्षक कवच बनवले पाहिजे. आपण सारे जण हात धुऊन घेत आहाेत ही चांगली सवय आहे, परंतु हात काेठे
स्पर्श करत आहे हेच जर आम्हाला कळत नसेल तर हात कितीही वेळा धुतले, कितीही वेळा सॅनिटाइझ केले तरी फायदा
काय? त्यासाठी परमात्म्याची शक्ती, परमात्म्याचे पावित्र्य अतिशय आवश्यक आहे. आपल्या सभाेवताल एक ऊर्जा सर्कल
आहे आणि या सर्कलमध्ये काेणीही प्रवेश करू शकत नाही, असा संकल्प आपण केला पाहिजे. याद्वारे आपण स्वत:ला,
कुटुंबाला पर्यायाने देशाला ऊर्जावान बनवू, ही जादू आहे आणि काेणीही ती करू शकताे.
परमेश्वराचे आभामंडळ हे माझे सुरक्षा कवच आहे. मी सदा सुरक्षित आहे. सकाळी उठल्यानंतर फाेन पाहण्यापूर्वी, हात
धुण्यापूर्वी, काेणाशी काही बाेलण्यापूर्वी आपला पहिला संकल्प हाच असला पाहिजे. कारण सकाळच्या पहिल्या विचाराचा
प्रभाव संपूर्ण दिवसभर राहताे. म्हणूनच तर आपण म्हणताे, सकाळी-सकाळी काेणाचे ताेंड पाहिले हाेते…
चांगला विचार करा; आपण जो विचार करताे ताे सिद्ध हाेताे
अर्थातच सकाळी उठल्याबराेबर पहिला विचार असा असला पाहिजे की, मी शांत आहे, शक्तिशाली आत्मा आहे, माझे
शरीर सुदृढ आहे, परमात्म्याच्या ऊर्जेच्या वर्तुळात माझे सारे कुटुंब सुरक्षित आहे. दाेन मिनिटे वेळ काढा आणि या वर्तुळाचे
मानसिक चित्रण करा. रात्री झाेपण्याच्या वेळीदेखील हाच विचार असला पाहिजे. जाे अखेरचा विचार असेल ताे साऱ्या
रात्रभर काम करत असताे आणि सकाळी उठल्याबराेबर ताेच पहिला विचार ठरताे.
आम्हाला कल्पना आहे की, आम्ही सुरक्षित आहाेत. उपरिनिर्दिष्ट भूमिका आणि संकल्पाचा विचार केवळ काेराेना
विषाणूपुरता मर्यादित नाही,

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »